मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू मृतांची ओळख पटलेली नाही !

741

मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू मृतांची ओळख पटलेली नाही !मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कंटेनर आणि कारच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वडगाव मावळ येथील ब्राम्हणवाडीजवळ कंटेनर आणि डस्टर या कारची जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मयत व्यक्तींपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राम्हणवाडी येथे कंटेनर आणि कार क्रमांक एम-एच १४ एफ एम ७२६१ या दोघांमध्ये भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याशेजारील खड्यात जाऊन पडली. त्यामुळे जखमींना बाहेर काढण्यासाठीही मोठी कसरत करावी लागली. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.मृतांपैकी एकाचे नाव राहुल नागरगोजे असून तो २४ वर्षाचा होता. त्याच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डवरून ही माहिती समोर आली आहे. तर जखमींमध्ये कंटेनर चालक लालाचंद यादवबरोबरच डस्टर गाडीमधील रविप्रेम सिंग, अमन सिंग, दिपाचू भारद्वाज आणि राजेंद्र चॅणोत्त यांचा समावेश असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघातग्रस्त कार ही मयत राहुलचीच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वडगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

Comments

comments

Loading...