१७ वर्षानंतर संक्रांतीचा आणि रविवारचा योग त्यामुळे आपल्या प्रगती साठी हे उपाय करायला विसरू नका !

3847

१७ वर्षानंतर संक्रांतीचा आणि रविवारचा योग त्यामुळे आपल्या प्रगती साठी हे उपाय करायला विसरू नका !महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.पंढरपूरमधील संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा आजचा मकर संक्रांत …. या दिवशी तील -गुळा बरोबरच महिलांसाठी सौभाग्याचा मानला जाणार्या सणा पैकी एक म्हणजेच मकर संक्रांत . या दिवशी भोगी करणे , वाण- वसा, वोवसायला जाणे या सारख्या रिती , परम्पर आजही जोपासल्या जात आहे . पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आज सकाळ पासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून आली . रुख्मिणी मातेच्या मंदिरात महिला एक मेकीना वाण – वसा मोठ्या श्रद्धेने देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.प्रादेशिक विविधता
उतर भारतात,
हिमाचल प्रदेश – लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
पंजाब – लोहडी अथवा लोहळी, (Lohri)पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटी साठी छोटी मुले घरोघरी जावून गाणी म्हणतात व शोकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात.शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ , तीळ टाकतात.हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा केले जाते.[१]
पूर्व भारतात,
बिहार – संक्रान्ति आसाम – भोगाली बिहु, (Bhogali Bihu) पश्चिम बंगाल – मकर संक्रान्ति ओडिशा – मकर संक्रान्ति
पश्चिम भारतात, गुजरात व राजस्थान – उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण) गुजरातमध्ये या दिवशी धान्य,तळलेल्या मिठाया, खाद्यपदार्थ बनावले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.दक्षिण भारतात,
कर्नाटक, आंध्र प्रदेश – (संक्रांति) तमिळनाडू – पोंगल, (Pongal) दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात.सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गुळ, दुध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात.मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव. भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
नेपाळमध्ये, थारू (Tharu) लोक – माघी अन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti) के माघ सक्राति (Maghe Sakrati) थायलंड – सोंग्क्रान ( Songkran) लाओस – पि मा लाओ (Pi Ma Lao) म्यानमार – थिंगयान (Thingyan)
या वर्षी 14 जानेवारीला मकरसंक्रांती रविवारी साजरी केली जाईल. यापूर्वी 2001 मध्ये रविवारी संक्रांती साजरी करण्यात आली होती. रविवारचा कारक ग्रह सूर्य असून हा सणही सूर्यदेवाचा आहे. यामुळे 2018 च्या मकर संक्रांतीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.सूर्य धनु राशीतून मकर राशीत गेल्यानंतर संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण चालू होईल. संपूर्ण दिवस सर्वार्थसिद्धी आणि सिद्धी योगही राहील.दानाचे विशेष महत्त्व
या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि दान देण्याचे विशेष महत्त्व आहे.मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या दानामुळे अक्षय (कधीही न संपणारे) पुण्यफळ प्राप्त होतात.मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो.सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो.या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

Comments

comments

Loading...