घरच्यांसोबत चुकूनही पाहू नका बॉलिवूडचे हे १० चित्रपट, या मध्ये आहेत हे बोल्डसिन पहा !

4136

घरच्यांसोबत अजिबात पाहू नका बॉलिवूडचे हे १० चित्रपट, या मध्ये आहेत हे बोल्डसिन पहा. सिनेरसिकांमध्ये सिनेमांची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून दोन क्षण निवांत मिळावे, स्ट्रेसबस्टर व्हावा यासाठी लोक वेळ काढून सिनेमे बघणे पसंत करतात. बॉलिवूडमध्ये तसे पाहता वर्षाला हजाराहून अधिक सिनेमे तयार होत असतात. मात्र त्यापैकी काही वादाच्या भोव-यातसुद्धा अडकतात. याचे कारण म्हणजे त्यातील बोल्ड कंटेंट, आक्षेपार्ह भाषा आणि न्यूडिटी हे असते.

अनेक सिनेमांच्या रिलीजवर सेन्सॉर बंदी आणतं असतं, तर काही सिनेमांमधील बोल्ड कंटेंटला कात्री लावण्यात येते. अनेक वादांनंतरसुद्धा सिनेमे रिलीज होतात, तेव्हा त्याची फुकटातच चांगली पब्लिसिटी झालेली असते. ब-याच सिनेमांना त्यातील बोल्ड कटेंटेमुळे अॅडल्ट (A) सर्टिफिकेट देऊन रिलीज करण्याची परवानगी दिली जाते. मात्र हे सिनेमे प्रेक्षक आपल्या कुटुंबीयांसोबत बसून बघू शकत नाहीत. अनेकदा लोक आपल्या मित्रांसोबतही अशा धाटणीचे सिनेमे बघणे पसंत करत नाहीत.

लिपस्टीक अंडर माय बुर्काडायरेक्टर – अलंकृता श्रीवास्तव
स्टारकास्ट – रत्ना पाठ शहा, कोंकणा सेन शर्मा, आहना कुमरा, प्लबिता बोरठाकूर, विक्रांत मेसी, सुशांत सिंग, वैभव तत्ववादी.
महिला आणि त्यांच्या शारीरीक संबंधाबाबत असलेल्या अपेक्षा आणि इच्छा या विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा फारच बोल्ड आणि सेक्स सीनने भरपूर आहे त्यामुळे महिलांबद्दल असलेला गैरसमज आणि त्यांच्यावर लादण्यात आलेली बंधने किती चुकीचे आहेत असा संदेश जरी हा चित्रपट देत असला तरी बोल्डनेसमुळे आपण हा चित्रपट एकट्यातच पाहावा.

अक्सर 2डियरेक्टर – अनंत महादेवन
स्टारकास्ट – जरीन खान, गौतम रोडे, अभिनव शुक्ला, लिलिट दुबे
2006 साली आलेल्या अक्सर या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. चित्रपटात जरीन खानने अभिनव शुक्ला आणि गौतम रोडेसोबत जबरदस्त बोल्ड सीन्स दिले आहेत त्यामुळे हा चित्रपट फॅमिलीसोबत आपण पाहू शकत नाही.

जिस्म (सीरीज)डायरेक्टर : फर्स्ट पार्ट- अमित सक्सेना, सेकंड पार्ट- पूजा भट
जिस्मच्या पहिल्या भागात बंगाली ब्युटी बिपाशा बसू आणि बॉलिवूड हंक जॉन अब्राहम यांचे अनेक हॉट सीन्स होते. सिनेमाने अनेक अवॉर्डही जिंकले, मात्र बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला हा सिनेमा प्रेक्षक आपल्या कुटुंबासोबत बघू शकत नाहीत. सिनेमाच्या दुस-या पार्टमध्येही अनेक स्टीमी सीन्सचा भडीमार आहे. दुस-या भागात पोर्न स्टारहून बॉलिवूड अॅक्ट्रेस बनलेल्या सनी लिओनीने अरुणोदय सिंहसोबत अनेक हॉट सीन्स दिले आहेत.

देव डीडायरेक्टर : अनुराग कश्यप
स्टार कास्ट :माही गिल, अभय देओल आणि कल्कि कोचलिन
‘देवदास’चे हे आधुनिक व्हर्जन तरुणाईला विशेष पसंत पडले. पण आधुनिकतेच्या नावाखाली सिनेमात अनेक स्टीमी सीन्स टाकण्यात आले. सोबतच व्हल्गर भाषेचाही प्रयोग सिनेमात करण्यात आला.

हंटर (2015)डायरेक्टर : हर्षवर्धन कुलकर्णी
स्टार कास्ट : गुलशन देवैया, राधिका आपटे, सई ताम्हणकर आणि वीरा सक्सेना
सिनेमाची कहाणी मंदार (गुलशन देवैया) नावाच्या अशा एका व्यक्तीची आहे, जो सेक्सचा शौकीन असतो. अगदी वयाच्या 12-13 व्या वर्षीपासूनच त्याला शारीरिक संबंधाविषयीचे आकर्षण निर्माण होते. ब्लू फिल्म बघणे, तरुणींचा पाछलाग करणे आणि अनेक महिलांसोबत सेक्स संबंध बनवणे त्याचे काम असते.

मस्ती (सर्व सीरिज)डायरेक्टर : इंद्र कुमार
स्टार कास्ट : विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी
मस्ती, ग्रँड मस्ती आणि ग्रेट ग्रँड मस्ती, तिन्ही सिनेमांचा कंटेंट अतिशय बोल्ड आहे. रितेश, विवेक, आफताब हे त्रिकुट आपल्या धमालमस्तीद्वारे प्रेक्षकांना हसवण्यात यसश्वी ठरले. मात्र त्यांच्या या सिनेमांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. हा सिनेमा तरुणाईला पसंत पडला, मात्र फॅमिली फिल्मच्या कॅटेगरीत हा सिनेमा मुळीच मोडत नाही.

रंग रसियाडायरेक्टर :केतन मेहता
स्टार कास्ट : रणदीप हुड्डा और नंदना सेन
‘रंग रसिया’ हा सिनेमा चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केतन मेहतांनी केलं असून रणदीप हुडा व नंदना सेन मुख्य भूमिकेत आहेत. ‘रंग रसिया’ या सिनेमामध्ये नंदना सेन हिने बोल्ड सीन खूप सहजतेने दिले.

मर्डरडायरेक्टरः अनुराग बसू
स्टार कास्टः इम्रान हाश्मी, मल्लिका शेरावत, अश्मित पटेल
हा सिनेमा प्रेक्षक मुळीच विसरु शकत नाहीत. या सिनेमाद्वारे मल्लिकाच्या रुपात बोल्ड अभिनेत्री बॉलिवूडला मिळाली. तर इमरान हाश्मीला बॉलिवूडचा सिरीअल किसर ही उपाधी या सिनेमानेच मिळवून दिली. दोघांनी बिनधास्तपणे सिनेमात अनेक बोल्ड दृश्ये दिली होती. बोल्ड कंटेंटमुळे हाही सिनेमा कौटुंबिक सिनेमांच्या श्रेणीत येत नाही.

एक छोटीसी लव्ह स्टोरीडायरेक्टरः शशिलाल नायर
स्टार कास्टः मनीषा कोईराला
मनीषा कोईराला स्टारर हा वादग्रस्त सिनेमा आहे. या सिनेमात मध्यमवयीन स्त्री आणि तरुण मुलामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होताना दाखवण्यात आले होते.

गँग्स ऑफ वासेपुर (सीरीज)डायरेक्टर : अनुराग कश्यप
स्टार कास्ट : मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, तिग्मांशु धूलिया, हुमा कुरैशी आणि ऋचा चड्ढा सिनेमात हिंसाचार मोठ्या प्रमाणात चित्रीत करण्यात आला आहे. शिवाय स्टीमी सीन्स आणि शिवीगाळसुद्धा खूप आहे.

लव्ह सेक्स और धोकाडायरेक्टरः दिबाकर बॅनर्जी
स्टार कास्टः अंशुमन झा, राजकुमार राव, नेहा चौहान
हा एक एक्सपेरिमेंटल सिनेमा होता. बोल्ड सीन्सचा भडीमार असूनदेखील लोकांनी त्याला पसंतीची पावती दिली. मात्र कुटुंबासोबत बसून हा सिनेमा बघू नका. नाहीतर लाजिरवाणे होण्याची वेळ येईल.

जुलीडायरेक्टरः दीपक शिवदसानी
स्टार कास्टः नेहा धुपिया, प्रियांशू चॅटर्जी, यश टोंक, संजय कपूर
नेहा धुपियाने या सिनेमात अनेक हॉट सीन्स दिले होते. वादग्रस्त सिनेमांपैकीच हा एक सिनेमा आहे. सिनेमाच्या रिलीजपूर्वी नेहाने वादग्रस्त वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. तिने म्हटले होते, बॉलिवूडमध्ये केवळ दोनच गोष्टी विकल्या जातात, एक म्हणजे शाहरुख खान आणि दुसरी म्हणजे सेक्स.

मस्तराम डायरेक्टरः अखिलेश जैसवाल
स्टार कास्टः तारा अलीशा, राहुल बग्‍गा, इश्तियाक खान, विनोद नहरडीह, कपिल दुबे, आकाश धैया
ही एका लेखकाची कहाणी आहे, जो सेक्शुअल फॅण्टसीवर पुस्तक लिहितो. बोल्ड पोस्टरमुळे सिनेमा वादात अडकला होता. अनेक ठिकाणी या सिनेमाच्या रिलीजवर बंदी आली होती.

हवसडायरेक्टरः करण राजदान
स्टार कास्टः मेघना नायडू, शनवर अली, तरुण अरोरा
ही अशा एका स्त्रीची कहाणी आहे, जी विवाहित असूनदेखील आपल्या पतीला धोका देते आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करते. या सिनेमातही बोल्ड कंटेट आहे.

क्या कूल हैं हम (सर्व सीरिज)डायरेक्टर : फर्स्ट पार्ट- संगीत सिवान, सेकंड पार्ट- सचिन यार्डी, थर्ड पार्ट- उमेश घाडगे
स्टार कास्ट : तुषार कपूर आणि रितेश देशमुख
सिनेमाचे तिन्ही भाग सेक्स कॉमेडीवर आधारित आहेत. अश्लिलता, द्विअर्थी संवादांमुळे हा सिनेमा एकट्याने बघितलेलाच बरा.

डेल्ही बेल्ली डायरेक्टर : अभिनय देव
स्टार कास्ट : इमरान खान, वीर दास, कुणाल रॉय कपूर, पूर्णा जगन्नाथन आणि शहनाज ट्रेजरीवाला
सिनेमाची कहाणी तीन रुममेट्सभोवती गुंफण्यात आली आहे. हे तिघेही एका अतिशय घाणेरड्या अपार्टमेंटमध्ये राहतात. सिनेमात प्रत्येक पाच मिनिटांनंतर एक असा सीन येतो, ज्यामध्ये अश्लिल किंवा व्हल्गर भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा सिनेमा कौटुंबिक धाटणीचा नाही.

बीए पास डायरेक्टर :अजय बहल
स्टार कास्ट :शिल्पा शुक्ला, शादाब खान और राजेश शर्मा
आपण नेहमीच सिनेमे, मालिकांमध्ये तरुणींच्या देह व्यापाराची कथा पाहिली आहे. मात्र बी.ए.पास अशा एक सिनेमा आहे, ज्यामध्ये तरुण देहव्यापारात उतरतो. सिनेमात बोल्ड सीन्ससोबतच असे काही सीन्स होते, ते प्रेक्षकांना मानसिकदृष्ट्या त्रासदायक होते.

हेट स्टोरी (सर्व सीरीज)डायरेक्टर : फर्स्ट पार्ट- विवेक अग्निहोत्री, सेकंड आणि थर्ड पार्ट- विशाल पंड्या
तिन्ही पार्टमध्ये सुडाची कहाणी वेगवेगळ्या अँगलने दाखवण्यात आली आहे. पण सोबतच सेक्स सीन्सचाही सिनेमांत भडीमार आहे. याच कारणामुळे हा सिनेमा कुटुंबीयांसोबत बसून बघणे शक्य होत नाही.

सिंसडायरेक्टर :विनोद पांडे
स्टार कास्ट :शाइनी आहूजा, सीमा रहमानी और नितेश पांडे
2005 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा न्यूड सीन्समुळे सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. या सिनेमामध्ये अभिनेता शायनी अहुजा हा एका महिलेच्या प्रेमात पडतो. या सिनेमामध्ये खूप इंटिमेट सीन्स होते.

रागिनी एमएमएस (सीरीज)डायरेक्टर : फर्स्ट पार्ट-पवन कृपलानी, सेकंड पार्ट- भूषण पटेल
दोन्ही सिनेमे हॉरर धाटणीचे आहेत. पण सिनेमातील स्टीमी सीन्समुळे हा सिनेमा फॅमिलीसोबत बसून बघणे योग्य नाही.

पार्च्डडायरेक्टर : लीना यादव
स्टार कास्ट : राधिका आपटे, सुरवीन चावला, तनिष्ठा चटर्जी आणि आदिल हुसैन
लीना यादव दिग्दर्शित आणि अजय देवगन प्रॉडक्शनच्या या सिनेमातील एका सीनमध्ये राधिका आपटे हिने अभिनेता आदिल हुसैनसोबत एक न्यूड सीन दिला आहे. शिवाय सिनेमात अनेक स्टीमी सीन्सही आहेत. त्यामुळे हा सिनेमा फॅमिलीसोबत बसून बघणे शक्य होत नाही.

Comments

comments

Loading...