काहीच लोकांनी पाहिलंय पृथ्वीवरील हे सुंदर नवं आयलॅंड !

478

काहीच लोकांनी पाहिलंय पृथ्वीवरील हे सुंदर नवं आयलॅंड. पॄथ्वीवर अनेक आयलॅंड असून या सुंदर आयलॅंड्सची भुरळ प्रत्येकालाच लागलेली असते. या सुंदर आयलॅंडच्या यादीत आणखी एका आयलॅंडची भर पडली असून पृथ्वीवर एका नव्या आयलॅंडचा जन्म झाला आहे. टोंगा देशाची राजधानी असलेल्या नुकूअलोफा जवळ हे नवे आयलॅंड तयार झाले आहे.

पृथ्वीवरील हे नवे आयलॅंड हे हुंगा टोंगा ज्वालामुखी पेटत असतानाच तयार होऊ लागले होते. डिसेंबर महिन्यात साऊथ पॅसिफिकमध्ये हे घडत होते. सध्या या आयलॅंडला कोणतंही नाव देण्यात आलेलं नाहीये. शिवाय अनेक शास्त्रज्ञांनी हे सांगितले की, हे आयलॅंड फार जुने नसून आताच तयार झाले आहे.पृथ्वीवरील या नव्या आयलॅंडची उत्सुकता अनेकांना लागली आहे. पण शोध लागल्यापासून आतापर्यंत या आयलॅंडवर केवळ १- ते १२ लोकांनीच भेट दिली आहे. येथे या लोकांना १० गुंफा आढळल्या आहेत. स्थानिक लोकांना हे टुरीस्ट डेस्टिनेशन व्हावं अशी आशा आहे. पण सध्यातरी १ हजार ६४० फूट ज्वालामुखीपासून तयार झालेलं आयलॅंड एक निर्जण स्थळ आहे. काही मच्छिमारांना हे आढळले तेव्हा तेही तिथे जाऊन आले. या आयलॅंडवर सध्या टोंगाचा राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात आला आहे.१० पेक्षा अधिक लोकांनी भेट न दिलेल्या या आयलॅंडवर काहींच्या पायांचे ठसे.काही गुंफा येथे आढळल्या असून त्या बघताना व्यक्ती.काही मच्छिमारांनी हे आयलंड बघितले तेव्हा तेही तिथे गेले.समुद्राच्या पाण्याने तयार झालेली ही नैसर्गिक नक्शी.समुद्राच्या पाण्याने तयार झालेली ही नैसर्गिक नक्शी.समुद्रातून वाहत आलेलं नारळ, आणि कचरा.टोंगाचा राष्ट्रीय ध्वज इथे लावण्यात आला आहे.

Comments

comments

Loading...