भारतात इतकी मोठमोठी व्यक्तिमत्वे होऊन गेली तरीही नोटांवर गांधीचा फोटो का ?

7172
http://www.india.com

भारतात इतकी मोठमोठी व्यक्तिमत्वे होऊन गेली तरीही नोटांवर गांधीचा फोटो का ? भारतीय रूपयांमध्ये चलनात असलेली कोणतीही आणि कितीही रूपयांची नोट घेतली तर, त्यावर महत्मा गांधींचेच चित्र पहायला मिळते. आपल्या लहानपणापासून आपण हेच पहात आलो. काय असेल याचे नेमके कारण?

http://www.india.com

भारतात इतकी मोठमोठी व्यक्तिमत्वे होऊन गेली असताना, भारतीय रूपयांच्या नोटेवर गांधीजींचेच चित्र का? हा प्रश्न आजच नव्हे तर, जेव्हापासून नोट पहायला मिळाली तेव्हापासून सतावणारा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भारतीय चलानी नोटांवरील गांधींच्या चित्राचे रहस्य सांगणार आहोत.

http://www.india.com

भारतीय चलनी नोटांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास काही गोष्टी हमखास दिसतात. त्या म्हणजे गांधीजींचा फोटो, निशाण दाखवणारी काही चिन्हे, काही नंबर्स आणि एखाददुसरा स्टॅंप; बस इतकेच. यात छापील कागदाला पैशाचे परिमाण मिळवून देणारी एक गोष्ट म्हणजे महात्मा गांधींचे चित्र.

http://www.india.com

या चित्रावरून अनेक वाक्यप्रचारही लोकांच्या बोलण्यात आले. जसे की, ‘वस्तू घेण्यासाठी- तूमच्याकडे किती बापू आहेत’. ‘आपल्याजवळ बापू आहेत, तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याचे काहीच कारण नाही’ किंवा ‘बापू दिले की, भलेभलेही खूश होतात. आपण सांगितलेले काम करायला तयार होतात’, या सर्वांत सतत छळणारा प्रश्न हाच की, नोटांवर गांधीजींचाच फोटो का?

http://www.india.com

या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनेकजण असे म्हणतात की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधिजींचे फार मोठे योगदान राहीले आहे म्हणून. पण, असा विचार केल्यास अनेकांनी तर देशासाठी आपल्या प्राणाचे बलीदानच दिले आहे. मग अशा महान विभूतींचे चित्र नोटांवर का नाही? इतकेच नव्हे तर, इतके महान देव आणि महापुरूष जन्माला घालणाऱ्या या देशात इतर कोणाचेचे चित्र न वापरता गांधीच का. तर या प्रश्नाचे एक समर्पक उत्तर आहे. ज्या उत्तराकडे फारसे कुणी गांभीर्याने पाहात नाही. किंवा अनेकांना ती गोष्टही माहित नाही.

http://www.india.com

भारतीय रूपयांवर गांधींचे चित्र असण्याचे सर्वात महत्वाचे कारण असे की, भारतात आणि भारताबाहेरही सर्वधीक परिचयाचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेले व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी. तुम्ही जगातल्या कोणत्याही देशात जा. तुम्हाला महात्मा गांधींना ओळखले नाही असा एकही देश सापडणार नाही. भारताचे प्रतिनिधीत्व आणि भारताला देश म्हणून जगभरात ओळख मिळवून देणाऱ्या व्यक्तिमत्वात महात्मा गांधींची गणना होते. इतकेच नव्हे तर, शांततेसाठी लढणारी एक मोठी ताकद म्हणूनही गांधीजींकडे पाहिले जाते.

http://www.india.com

भारतामध्ये विविध जाती-धर्माचे, पंथाचे लोक राहतात. प्रत्येकाचे हिरो वेगवेगळे आहेत. त्यातही त्या, त्या हिरोंना त्यांचे त्यांचे प्रदेश किंवा त्याच्या आजूबाजूचा एखाददुसरा प्रदेश यांपलीकडे ओळख नाही. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या लोकांना वाटते की, आपल्या हिरोचे चित्र आपल्या नोटांवर असावे. पण तसे करता येत नाही.

http://www.india.com

कारण देशाचे चलन म्हणून जेव्हा एखादे चलन आपल्याला जगभरात पाठवायचे असते. तेव्हा त्यात नेमकेपणा असावा लागतो. त्याची परिमानेही ठरलेली असतात. त्यामुळे नोटांवर अशाच व्यक्तिचे चित्र असावे ज्याला सर्वमान्यता आहे. त्यांच्या नावाला कोणाचा आक्षेप असून नये. याच कारणामुळे गांधीजींचे चित्र नोटांवर छापले जाते, असे सांगितले जाते.

 

Comments

comments

Loading...