भारतातील या मंदिराचे स्तंभ वाऱ्याने हलतात, काय आहे याचं रहस्य जाणून घ्या !

814

आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत जी आपल्या चमत्कार आणि कथेमुळे अख्या जगात प्रसिद्ध आहेत. आंध्रप्रदेशातील अनंतपूरमध्ये एक असंच मंदिर आहे. जे आपल्या इतिहास आणि चमत्कारासाठी प्रसिध्द आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिराचे स्तंभ कोणत्याही आधाराशिवाय उभे असून वाऱ्यामुळे हलत राहतात. याशिवाय या मंदिराचा संबंध रामायण काळाशी सुद्धा मोठ्या प्रमाणात जोडला गेला असल्याचं सांगितलं जातं.16व्या शतकात झाली मंदिराची स्थापना-
हे अनोखं मंदिर बंगळुरूपासून जवळपास 100 किलोमीटर लांब असलेल्या आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी गावात आहे. ऐतिहासिक मतानुसार हे मंदिर 16व्या शतकात बनविण्यात आलं आहे. या मंदिराला लेपाक्षी मंदिर किंवा वीरभद्र मंदिर सुद्धा म्हंटलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे यातील स्तंभ कोणत्याही आधाराशिवाय हवेत स्थिर आहेत आणि ते वाऱ्याने हलताना दिसतात. या हलत्या स्तंभाच्या बाबतीत अनेक कथा प्रसिद्ध आहेत. या स्तंभाच्या खालून साडी किंवा अन्य कोणतंही वस्त्र काढल्यास मनुष्याच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं.रामायण काळाशी जोडलं गेलं आहे मंदिर-
लेपाक्षी गावाशी जोडली गेलेली रामायणातील एक कथा सुद्धा चांगलीच प्रचलित आहे. या कथेनुसार, सीता मातेचं हरण झालं त्यावेळी पक्षिराज जटायुने रावणासोबत युद्ध केलं होतं. त्यावेळी युद्धा दरम्यान जटायू जखमी होवून याच परिसरात पडले होते. जेव्हा प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध घेत असताना येथे पोहोचले तेव्हा त्यांना जखमी अवस्थेतील जटायू दिसला. तेव्हा प्रभू रामांनी त्याला पाहून उठो पक्षी असं म्हंटलं, ज्याला तेलुगू भाषेत ‘ले पक्षी’ असं म्हंटलं जातं. तेव्हापासून या जागेचं नाव लेपाक्षी असं पडलं. या मंदिराच्या आवारातच एक विशाल पायाचा ठसा जमिनीत रुतल्याचं पाहायला मिळतो. ज्याला प्रभू रामचंद्र यांच्या पायाचा ठसा समजून पूजलं जातं.येथे आहे नंदीची सगळ्यात विशाल मूर्ती –मंदिराच्या प्रवेशद्वारातच नंदीची एक विशाल मूर्ती बनवण्यात आली आहे. ही मूर्ती एकाच दगडापासून बनविण्यात आली आहे. एकाच दगडापासून बनविलेल्या देशातील विशाल मूर्तींपैकी ही एक मूर्ती समजली जाते. मंदिराच्या भिंतीवर देवी- देवतांच्या आणि महाभारत- रामायणाच्या कथा कोरण्यात आलेल्या आहेत.अद्याप कोणालाही सोडवता आलं नाही या मंदिराचं रहस्य-
हे मंदिर आपल्या हलत्या स्तंभामुळे इतकं प्रसिद्ध आहे की हे रहस्य सोडविण्यासाठी आणि या मंदिराबद्दल जाणून घेण्यासाठी एक ब्रिटिश इंजिनियर भारतात आला होता.त्याने हे रहस्य सोडविण्याचे खूप खूप प्रयत्न केले, मात्र त्यात इतरांप्रमाणे त्यालाही यश आलं नाही. आणि तो ही इतरांप्रमाणे हताशपाने तेथून परदेशी निघून गेला.

Comments

comments

Loading...