या आहेत भारतीय क्रिकेटरच्या आई, जाणून घ्या क्रिकेटर्स आणि त्यांच्या आईबद्दल खास गोष्टी !

983

मे महिन्याचा दुसरा रविवार हा ‘मदर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. आईच्या प्रेमाचा, आईपणाचा, मातृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजेच ‘मदर्स डे’. तसं पहायला गेलं तर आपल्या आईसाठी प्रत्येक दिवस हा एक आनंदाचा दिवस असतो ज्यावेळी ती आपल्या मुलाला किंवा मुलीला हसताना, खेळताना पाहते. ज्या दिवशी मुलाला त्रास होतो तो दिवस आईसाठी खुपच वाईट दिवस असतो. आई बद्दल जेवढं लिहू तेवढं कमीच आहे.आई ही आपल्या बाळाच पहिली गुरु असते. ज्यावेळी एखादा मुलगा किंवा मुलगी यशाच्या मार्गाने पूढे जात असतो त्यावेळी त्यांच्या मागे त्यांच्या आईचाच मोठा सहभाग असतो. आपल्या देशातील क्रिकेटर्सही याचा अपवाद नाहीयेत. या ‘मदर्स डे’च्या दिवशी पाहूयात टीम इंडियातील क्रिकेटर्स आणि त्यांच्या आईच्या प्रेमाबाबत.

सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव मानला जाणा-या ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने अनेकदा म्हटलं आहे की, आज त्याला मिळालेल्या यशामागे तीन व्यक्तींचा हात आहे. पहिला म्हणजे त्यांचा भाऊ अजित तेंडुलकर, दुसरा व्यक्ती म्हणजे गुरु रमाकांत आचरेकर आणि तिसरी व्यक्ती म्हणजे सचिन तेंडुकरची आई रजनी तेंडुलकर या तिघांच्या मदतीने सचिन हा केवळ ‘द ग्रेट सचिन तेंडुलकर’ बनला. आपल्या आई शिवाय सचिन स्वत:ला प्रत्येक ठिकाणी अपूर्ण पाहतो. सचिनच्या या लाडक्या आईला आम्हीसुद्धा सलाम करतो. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं की, मी ज्या-ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी चाहते ‘सचिन-सचिन’चे नारे देतात. हा नारा आज सर्वत्र लोकप्रिय झाला आहे आणि याची रचनाकारही माझी आईच आहे.युवराज सिंग
टीम इंडियाच्या धडाकेबाज बॅट्समनपैकी एक असलेला युवराज सिंग याला मम्माज बॉय असेही म्हटले जाते. युवराजच्या प्रत्येक आनंदाच्या आणि कठीण प्रसंगी त्याच्यासोबत सावलीसारखी राहणारी आईच आहे. क्रिकेटच्या मैदानात युवराजने लगावलेल्या सिक्सर्सचा रेकॉर्ड असो किंवा रियल लाइफमध्ये युवराजने कँसरवर मिळवलेला विजय असो, युवराज सिंगची प्रत्येक गोष्ट आपल्या आईपासूनच सुरु होते. आपल्या मुलासाठी नेहमीच ढाल बनणारी शबनम सिंग यांना संपूर्ण देश मनापासून सलाम करतो.

विराट कोहली
टीम इंडियाचा कॅप्टन अर्थात विराट कोहली याला जगामध्ये सर्वाधिक सुंदर कुणी महिला वाटते तर ती म्हणजे त्याची आई सरोज कोहली. कोहलीला विराट बनविणारी त्याच्या आईने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र, त्यांनी कधीही विराटला या त्रासाची जाणीव करु दिली नाही. विराट कोहली याने खुपच कमी वयात आपल्या वडिलांना गमावलं. यानंतर सरोज या आई-वडील बनून विराटच्यासोबत कायम राहील्या.महेंद्र सिंग धोनी
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याच्या संदर्भात नेहमी म्हटले जाते की, तो आपल्या मनातलं कुणासमोरही लवकर बोलत नाही. धोनीच्या मनात कधी आणि काय सुरु आहे हे कुणीच ओळखु शकत नाही. मात्र, असं कुणीतरी आहे ज्यांच्यासोबत धोनी आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करतो आणि ती व्यक्ती म्हणजे त्याची आई देवकी सिंग. आपल्यापैकी खुपच कमी लोकांना माहिती आहे की, 2011 वर्ल्डकपच्या फायनल मॅचच्या काही क्षणपूर्वी धोनीने आपल्या घरी केवळ आईसोबतच बोलणं केलं होतं आणि यानंतर काय झालं हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे.सुरेश रैना
सुरेश रैना टीम इंडियाचा हसमुख प्लेयर समजला जातो. सुरेश रैनाही आपल्या आईचा फेव्हरेट आहे. टी-20 क्रिकेटमध्ये स्फोटक बॅटींग करणारा सुरेश रैना याने आपली लाइफ पार्टनर सुद्धा आपल्या आईच्या सांगण्यावरुन निवडली आहे. आपल्या आईला आपला आदर्श मानणारा सुरेश रैना याच्या प्रत्येक यशामागे त्याच्या आईने दिवस-रात्र केलेल्या प्रार्थना आहेत.

Comments

comments

Loading...