दुबईतील आश्चर्यजनक या ५ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

723

दुबईतील आश्चर्यजनक या ५ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का. संयुक्त अरब अमीराती म्हणजे यूएई आज नॅशनल डे साजरा करत आहे. यूएई मिडल ईस्ट एशियामधील असा जो सात छोट्या अमीराती म्हणजेच(शेख शासित राज्य) आबु धाबी, दुबई, शारजाह, रस अल-खैमा, अजमन, उम्म अल कॅवेन आणि फुजेरह मिळून बनला आहे. १८७३ ते १९४७ पर्यंत हा देश ब्रिटीश भारतच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर या देशाचं शासन लंडनच्या विदेश विभागातून चालू लागलं. त्यानंतर २ डिसेंबर १९७१ मध्ये अरबच्या खाडीमध्ये असलेल्या अमीरात फेडरल स्टेटनुसार एकत्र आले आणि स्वतंत्र संयुक्त अरब अमीरातीची स्थापना झाली.यूएईसंबंधी काही खास गोष्टी:
ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजच्या रिपोर्टनुसार, तेल भंडाराच्या बाबतीत यूएई जगातला सहावा सर्वात मोठा देश आहे. या देशाची इकॉनॉमी मिडल ईस्ट एशियामध्ये सर्वात विकसीत आहे. दुबईमध्ये लोकांना इन्कम टॅक्सही द्यावा लागत नाही. जगातली सर्वात उंचर इमारतही इथेच आहे. यासोबतच मानवनिर्मित सर्वात मोठा सी-पोर्ट आणि सर्वात बिझी इंटरनॅशनल एअरपोर्टही याच देशात आहे.१) दुबईत घरातच ड्रिंक करण्यासाठी लायसेन्स आवश्यक आहे. लिकर लायसन्सशिवाय इथे लोक घरात दारू पिऊ शकत नाहीत.२) दुबईत अ‍ॅड्रेसची कही सिस्टीम नाहीये. इथे ना कोणता पिनकोड आहे, ना एरिया रो आणि ना कोणती पोस्टल सिस्टीम आहे. इथे अमीरात पोस्ट नावाने एक पोस्टल एजंसी आहे, जी संपूर्ण देशातील पोस्ट ऑफिससे ऑपरेट करते. याच्या एकट्या दुबईतच दोन डझन ब्रॅन्चेस आहेत. इथेच पोस्ट ऑफिस बॉक्स आहे. इथे येऊन आपलं सामान घेऊन जाण्याची जबाबदारी लोकांची असते.३) दुबईत असेही एटीएम आहे ज्यातून गोल्ड बार म्हणजेच सोन्याची बिस्कीटे आणि सोन्याची नाणी काढता येतात. या मशीनवरही सोन्याची मोठी लेअर बघायला मिळते. आणि इथे ग्राहकांना २४ कॅरेट गोल्ड क्वाइन आणि गोल्ड बिस्कीटे मिळतात.४) दुबईची सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफामध्ये ८० फ्लोरच्या वर राहणा-या लोकांना रमझान दरम्यान रोजा सोडण्यासाठी दोन मिनिटे जास्त वाट बघावी लागते. ते बाकी लोकांपेक्षा दोन मिनिटे उशीराने इफ्तार करतात. कारण जमीनवर राहणा-या लोकांच्या तुलनेत त्यांना सुर्य उशीराने दिसतो.५) नाव भलेही संयुक्त अरब अमीरात मात्र अरब लोकसंख्या मायनॉरिटीमध्ये आहे. इथे १३ टक्के लोकच अरबी आहेत. इथे राहणा-या लोकांमध्ये भारतीय, पाकिस्तानी आणि बांग्लादेशी जास्त आहेत.६) दुबई पोलिसांच्या ताफ्यात लॅम्बॉर्गिनी, फरारी आणि बेन्टले कारचा समावेश आहे. या इतर कार्सच्या तुलनेत जास्त वेगाने धावतात. त्यामुळे गुन्हेगारांना पकडने सोपं होतं.७) इथे नियम खूप कठोर आहेत. दुबईमध्ये एका ब्रिटीश नागरिकाला चार वर्ष शिक्षा यासाठी झाली की, त्याचे शूजमध्ये साखरेच्या एका दाण्यापेक्षाही छोटा भांगचा तुकडा मिळाला होता.८) जगातला सर्वात मोठा रोलर कोस्टर अबू धाबेच्या फरारी वर्ल्डमध्ये आहे. हा काही सेकंदात २४० किमी प्रति तासाचा वेग पकडतो. फरारी वर्ल्डला जगातल्या सर्वात मोठ्या इनडोर थीम पार्कसाठीही ओळखले जाते.९) दुबई खूप फास्ट डेव्हलपमेंट होत आहे. उंच इमारतींचे बांधकामही मोठ्या प्रमाणात होत असल्याने जगभरातील साधारण २५ टक्के ऑपरेशनल क्रेन्सही दुबईमध्ये आहेत.

Comments

comments

Loading...