जाणून घ्या श्रीतिरुपती भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात !

3217

जाणून घ्या श्रीतिरुपती भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात. आज आपण या लेखात श्री भगवान विष्णूच्या सर्वात श्रीमंत अवतार आणि माझे व तमाम हिंदूचे श्रद्धास्थान पृथ्वीतलावर साक्षात स्वर्ग आहे असे जिथे देवी
श्रीलक्ष्मी पति व देवी श्री पद्मावती पति म्हणून ओळखले जाणारे तिरुपती येथील
श्री व्यंकटेश्वर श्री बालाजी भगवान यांच्या बद्दल माहिती घेऊया.
ज्योतिष आकाश पुराणिक
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत.या सर्व मंदिरांची स्वतःची अशी विशेष ओळख आहे.आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत तिरुपती व्यंकटेश्वर(बालाजी)मंदिराची माहिती देत आहोत.हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात स्थित आहे.श्री व्यंकटेश्वर बालाजी बद्दल माहिती
प्रभू व्यंकटेश्वराला भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते.शास्त्रानुसार,भगवान विष्णूंनी काहीकाळ स्वामी पुष्करणी तलावाजवळ वास्तव्य केले होते.हा तलाव तिरुमलाजवळ स्थित आहे.
तिरुमलाला तिरुपतीच्या चारही बाजूंनी असलेले सात डोंगर,शेषनागाच्या सात फन्यांवर आधारित’सप्तगिरी’पर्वत असेही संबोधले जाते.या पर्वत रांगांमध्ये स्थित बालाजीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे.जवळपास सात फुट उंच देवाची मूर्ती श्याम वर्ण आहे.बालाजीच्या हातामध्ये शंख,चक्र,गदा,पद्म स्थित आहे.देवाच्या दोन्ही बाजूला श्रीदेवी आणि भूदेवी यांच्या प्रतिमा आहेत.तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगू व तमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो.
एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.
त्या वारुळात श्रीविष्णू वास्तव्यास होते.
भृगु ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारली आणि तरीही विष्णूंनी त्यांचे पाय चेपुन क्षमा मागितली, या रागाने लक्ष्मी वैकुंठ सोडुन निघुन गेली. लक्ष्मी सोडुन गेल्याने वैकुंठाची शोभा निघुन गेली आणि विष्णूही निर्धन झाले. तेव्हा लक्ष्मीस शोधण्यासाठी विष्णू भुलोकी मनुष्यरुपात वास्तव्यास आले. त्यांनी शेषाद्री पर्वतावर वारुळात मुक्काम केला होता आणि तिथल्या राजाची एक गाय त्या वारुळावर जाऊन दुध सोडायची. अशी कथा आहे.
तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातातलग्नासाठी बालाजीने कुबेराकडुन कर्ज घेतले होते, तेव्हा त्याने कुबेराला सांगितले की कलियुगात माझे भक्त मला सोने चांदी पैसे वाहतील, त्यातुन मी तुझे कर्ज फेडीन.
विष्णूंच्या अनेक अवतार, रुपातली फक्त बालाजीची मुर्ती अशी आहे, जिचा वरदहस्त खाली झुकलेला आहे, जणू तो भक्तांना लक्ष्मीप्रमाणे धन देत आहे.

श्री बालाजीच्या मंदिराविषयी माहितीश्री व्यंकटेश्वराचे हे पवित्र आणि प्राचीन मंदिर व्यंकटाद्री नावाच्या सातव्या पर्वतावर स्थित असून मंदिराच्या जवळ स्वामी पुष्करणी तलाव आहे. यामुळे येथे बालाजीला भगवान व्यंकटेश्वर नावाने ओळखले जाते. यांना सात पर्वतांचे देवता असेही मानले जाते. मंदिराच्या गर्भगृहात भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती आहे.
सोन्याच्या दरवाजासमोर तिरुमहामंडपंम नावाचा मंडप आहे. मंदिर परिसरात सुंदर दरवाजे, मंडप आणि छोटे-छोटे मंदिर आहेत. देवाच्या मंदिरासमोर सोन्याने मढवलेला स्तंभ आहे. दरवाजावर जय-विजय यांची मूर्ती आहे. या मंडपात ‘हुंडी’ नावाची एक बंद दानपेटी असून यामध्ये भक्त गुप्तदान करतात. बालाजीचे दर्शन घेणाऱ्या भक्ताची प्रत्येक इच्छा देव पूर्ण करतात असे मानले जाते.मंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतकºयास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.बालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु होती. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात.हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला दिल्याचे वृत्तपत्रातून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी किंवा त्याच्या बाह्यरूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे.

केस दान करण्याची प्रथा
श्री कल्याण कट्टा / केसांचे दानतिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रात देवस्थानला ७४ कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे आॅनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. या लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.
मंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठ्या इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. येणाºया भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणाºया पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.येथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणाºयाला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
तिरुपती मंदिरात केशदान करण्याची प्रथा आहे. या प्रथे अंतर्गत भक्त स्वतःचे केस देवाला समर्पित करतात. याच अर्थ, केसांसोबत स्वतःचा अहंकार देवाला समर्पित केला जातो. मंदिराजवळ ‘कल्याण कट्टा’ या ठिकाणी सामुहिक रुपात केशदान केले जाते. केशदान केल्यानंतर येथेच स्नान केले जाते आणि त्यानंतर पुष्करणीमध्ये स्नान करून मंदिरात दर्शनासाठी भक्त जातात.प्रमुख उत्सव ब्रह्मोत्सव आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा काळ तिरुपतीचा सर्वात प्रमुख उत्सव ‘ब्रह्मोत्सवम’ असून, हा प्रसन्नतेचा उत्सव मानला जातो. नऊ दिवस चालणारा हा उत्सव वर्षातून एकदा साजरा केला जातो. कन्या राशीमध्ये सूर्याचे आगमन झाल्यानंतर उत्सवाला सुरुवात होते. या व्यतिरिक्त येथे वसंतोत्सव, तपोत्सव, पवित्रोत्सव, अधिकामासम हे उत्सव साजरे केले जातात.

हूडी/दान
श्री तिरूपति श्रीबालाजी सर्वात श्रीमंत मंदिर आहे
तिरुपती बालाजीच्या मंदिरात दररोज 50,000 भक्त दर्शनासाठी येतात.भक्तांनी केलेले दान कोटींच्या घरात असते.प्रत्येक वर्षात या मंदिरात दान स्वरुपात अब्जो रुपये जमा होतात.या मंदिराचे खांब सोन्याने मढवलेले आहेत.यामुळे या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते.अलीकडे विविध धार्मिक संस्थानांच्या वाढत्या श्रीमंतीबद्दल जोरदार चर्चा होत असते. मध्ये केरळमधील पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचे आकडे डोळे विस्फरणारे ठरले. अजुनही या मंदिराचे काही दरवाजे उघडायचे बाकी आहेत. या ऐतिहासिक मंदिरात सापडलेला खजिना तर दहा लाख कोटींचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला. या श्रीमंतीबाबत विचार करायचा तर बालाजी देवस्थानचा क्रमांक वरचा लागतो. या देवस्थानचे उत्पन्न काही अब्जात जाणारे आहे. मंदिराला एवढे दान मिळते की मंदिराच्या काही भिंती सोन्याच्या पत्र्याने मढवल्या गेल्या आहेत. तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात. भक्तांनी केलेले पैशाचे हे दान मोजण्यासाठी चाळणीतून हे पैसे चाळून वेगळे केले जातात. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक भाविक हे दान करत असतो. अंगठ्या, सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे.आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चालल्याचे दिसून येते. पैसे देऊन व्हीआयपी रांग आणि सोन्याचे दान करणारे नवस भाव खाऊन जातात. कधी काळी शांततेची स्थाने असणारी मंदिरे आता मात्र, प्रचंड गजबजाट आणि कोलाहल बनू लागली आहे. त्याला धार्मिक स्वरुप येऊ लागले आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक पंथाचे देव वेगळे बनले आहेत. देशातल्या प्रत्येक मंदिरातील दानपेटीत दान वाढतच जाते. शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी 32 लाख रु पये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय. मंदिरातील भाविकांना रांगेत थंडावा मिळावा यासाठी एसीची व्यवस्था केली. रोज दान देणाºयांच्या संख्येत वाढ होताना दिसते. हे दान गुप्त स्वरुपात होते. पद्मनाभस्वामी मंदिराचा सुमारे एक लाख कोटीचा खजिना आहे. तर तिरु पती बालाजी मंदिराचा 50 हजार कोटीचा खजिना आहे. वैष्णोदेवी वार्षिक दान 500 कोटी तर शिर्डीचे साईबाबा संस्थान वार्षिक दान 200 कोटींच्या वर आहे.हे आकडे ऐकले तर आपला भारत गरीब म्हणावा का? हा प्रश्न उपस्थित होतो. आपण केलेला नवस पूर्ण झाल्यास हा नवस देणगी स्वरुपात, सोन्याच्या स्वरुपात देण्याची प्रथा अलिकडे सुरू झाली आहे. खरेतर गोरगरीबांसाठी अन्नछत्रालय, शैक्षणिक संस्था, रस्ते, सोई सुविधा, हॉस्पिटल, पाणीप्रश्न या सारख्या प्रश्नांकरिता हे दिलेले गुप्त दान वापरण्याची खरी गरज आहे. काही देवस्थान संस्था हे उपक्रम राबवित असतील ही तरीही मोठ्या प्रमाणावर हे दान वापरले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी काही महिन्यांपूर्वी या मंदिराकडील सोने बाजारात आणण्याची कल्पना मांडली. त्यावरून वाद घालण्या पलिकडे आपण काहीही करत नाही. पंतप्रधानांची ही योजना खरच स्वागतार्ह्य म्हणावी लागेल.

पदयात्रा करणाऱ्या भक्तांसाठी तिरुमला देवस्थानाने एक विशेष मार्ग तयार केला आहे. या मार्गाने भक्त मंदिरापर्यंत पोहोचू शकतात.
श्रीतिरुपती भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात.तिरुमला व्यंकटेश्वर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर आंध्रप्रदेशातील तिरुमला पर्वत रांगामध्ये वसलेले आहे. हे मंदिर भारतात सर्वात प्राचीन आणि श्रीमंत मदिर रुपात ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित विविध मान्यता असून यामधील काही खास गोष्टींची आज आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत. या गोष्टी तुम्हाला कदाचित पटणार नाहीत पंरतु बालाजीचे भक्त या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवतात…

मान्यता नंबर 1.
या मंदिरात भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत. असे मानले जाते की, या केसांचा कधीही गुंता होत नाही आणि हे नेहमी मुलायम राहतात.

मान्यता नंबर 2.
व्यंकटेश्वर बालाजी मूर्तीचा मागील भाग नेहमी ओलसर राहतो. ध्यानपूर्वक कान लावून ऐकल्यास समुद्राचा आवाज ऐकू येतो.

मान्यता नंबर 3
मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छडी आहे. असे मानले जाते की, या छडीचा उपयोग देवाच्या बाल रुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. यामुळे बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरु झाली.मान्यता नंबर 4
बालाजी मंदिरातील गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यास मूर्ती गाभाऱ्याच्या मधोमध दिसते, परंतु वास्तवामध्ये तुम्ही बाहेर उभे राहून पाहिल्यास ही मूर्ती गाभाऱ्यात उजव्या बाजूला स्थित असलेली दिसते.

मान्यता नंबर 5
गुरुवारी भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते. दुसऱ्या दिवशी हा लेप काढून टाकल्यानंतर मूर्तीवर देवी लक्ष्मीचे चिन्ह उमटलेले असतात.

मान्यता नंबर 6
मूर्तीवर अर्पण करण्यात येणारे सर्व फुले आणि तुळशीची पाने भक्तांना परत न देता, सर्व सामग्री बारीक करून मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीमध्ये टाकली जाते.मान्यता नंबर 7
मंदिरातील पुजारी दिवसभर मूर्तीवर अर्पण झालेली फुले मागे फेकत राहतात, अर्पण केलेल्या फुलांकडे पाहत नाहीत. कारण या फुलांकडे पाहणे चांगले मानले जात नाही.

मान्यता नंबर 8
या मंदिरात एक दिवा हजारो वर्षांपासून प्रज्वलित असून हा दिवा कोणी लावला आणि केव्हापासून चालू आहे कोणालाही माहिती नाही.

मान्यता नंबर 9
स्थानिक मान्यतेनुसार, 18 व्या शतकात हे मंदिर 12 वर्ष बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात एका राजाने 12 लोकांना मृत्युदंड दिला आणि सर्वांचे शव मंदिरावर लटकवले होते. असे म्हणतात की, त्यावेळी व्यंकटेश्वर स्वामी प्रकट झाले होते.मान्यता नंबर 10
या मंदिरापासून 23 किलोमीटर अतंरावर एक गाव आहे. या गावामध्ये निवास करणारे लोकच फक्त गावात ये-जा करू शकतात. हे लोक कडक नियमांचे पालन करत जीवन व्यतीत करतात. याच गावामधून भगवान व्यंकटेश्वरासाठी फुल, दुध, तूप, लोणी इ. सामग्री आणली जाते
ज्योतिष शास्त्राचा अभ्यासनुसार ज्यांना राहू ग्रहची अठरा वर्षांची महादशा सुरू आहे व ज्यांना व्यवसायात धनाची नेहमीच कमतरता वाटते आणि आपला धन संचय लाभ होण्यासाठी आपण वर्षभरात एकदा तरी श्रीमहालक्ष्मी पति श्री बालाजीचे तिरुपती जाऊन दर वर्षी दर्शन घ्यावे आपणास निश्चित फायदा होईल आणि जो तीन वर्षे सलग श्री तिरूपति श्रीबालाजीचे दसर्‍याला दर्शन करतो भगवान बालाजी त्याला जीवनात काहीच कामी पडू देत नाही व आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री बालाजीला प्रिय असणारा पन्ना रत्न आपली मनोकामना मागुन श्री बालाजीच्या हूडी अर्पण करावा….
श्रीव्यंकट रमण गोविंदा….गोविंदा…

Comments

comments

Loading...