एकेकाळी McDonald’s मध्ये वेटर म्हणून करायचा काम, आता फिरतोय ९९ लाखाच्या गोल्ड कार ने !

544

एकेकाळी McDonald’s मध्ये वेटर म्हणून करायचा काम, आता फिरतोय ९९ लाखाच्या गोल्ड कार ने. अनेक असे लोक आहेत जे त्यांच्या इच्छाशक्तीने, मेहनतीने असं यश संपादक करतात ज्यावर विश्वास ठेवणेही कधी कधी कठिण होऊन बसतं. शून्यातून विश्व निर्माण करणा-यांची हीच खासियत आहे. असाच एक १९ वर्षीय तरूणाची आहे जो आज ९९ लाखाच्या कारमध्ये फिरतो. महत्वाची गोष्ट म्हणजे तो कधीकाळी McDonald’s मध्ये पार्ट टाईम जॉब करायचा.Robert Mfune हा १६ वर्षांचा असतानापासून McDonald’s मध्ये Part-Time नोकरी करत होता. त्यासोबतच त्याने Binary Trading चे बारकावे शिकले. आणि १७ वर्षाचा असताना त्याने यात व्यापार सुरू केला. आज तो एक कोट्याधीश असून त्याने ९९ लाखांची एक कार खरेदी केली आणि आईसाठी त्याने एक घरही घेतलं.हा तरूण Southampton येथील त्याच्या घरातून ट्रेडींग करत होता आणि बाकी रिकाम्या वेळात तो अभ्यास करत असे. Binary Trading मधून कमावलेल्या पैशांमधून त्याने गोल्डन Bentley ही कार घेतली. आज तो प्रसिद्ध बिझनेस मॅन म्हणून ओळखला जातो. McDonald’s काम करत असताना त्याचा एक युनिफॉर्म होता. तो त्याने फ्रेम करून त्याच्या घरात लावला आहे.या १९ वर्षीय तरूणाने आता Coffee Shops आणि Property मध्ये गुंतवणूक केली आहे. एक काळ असा होता की, त्याचं वय लहान असल्याने त्याला अकाऊंट काढता आलं नव्हतं. त्यामुळे त्याने त्याच्या आईच्या नावाने अकाऊंट उघडले होते.गाड्यांचा शौकीन असलेल्या या तरूणाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याने Bentley या कारला गोळ्ड बॉडी किटने सजवले आहे. तो सांगतो की, अशी कार सा-या देशात कुणाकडेही नाहीये. त्याची ही कार मात्र त्याच्या आईला आवडली नाही.

Comments

comments

Loading...