विराट कोहली ला एका इंस्टाग्राम पोस्ट ला किती पैसे मिळतात जाणून तुम्हालाही बसेल धक्का !

829
India's captain Virat Kohli attends a news conference ahead of their first test cricket match against England in Rajkot, India, November 8, 2016. REUTERS/Amit Dave

विराट कोहली ला एका इंस्टाग्राम पोस्ट ला किती पैसे मिळतात जाणून तुम्हालाही बसेल धक्का. जाहिरात विश्वातील सर्वात मोठा ब्रँड टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली असून त्याचे भारतासह परदेशातही चाहते आहेत.विराटचे दीड कोटी इंस्टाग्रामवर, दोन कोटी ट्विटरवर आणि ३ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स फेसबुकवर आहेत.क्रिकेटच्या मैदानात सातत्यपूर्ण खेळी आणि तिन्ही प्रकारात संघाच्या नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या विराट कोहली Virat Kohli हा देशातला श्रीमंत खेळाडू आहे. गेल्या महिन्यात फोर्ब्सनं जगभरातील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये विराटचाही समावेश आहे. विराट हा सोशल मीडियावरही सर्वात लोकप्रिय क्रिकेटर आहे. इन्स्टाग्रामवर सक्रीय असणाऱ्या विराटचे १ कोटी ६७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.विराटच्या प्रत्येक इन्स्टा पोस्टवर हजारो कमेंट आणि लाईक्सचा ‘पाऊस’ असतो. ‘झी न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे विराटला दिवसाला जवळपास तीन कोटींची कमाई होते. आपल्या पोस्टमधून एखाद्या ब्रँडला प्रसिद्धी द्यायची असेल तर विराट ३.२ कोटींच्या आसपास मानधन घेतो. जाहिरातीसाठीदेखील विराट सर्वाधिक मानधन घेतो. अनेक बडे क्रिकेटर्स जाहिरातीसाठी २ ते ४ कोटी मानधन घेतात, पण विराटच्या मानधनाचा आकडा यापेक्षाही मोठा आहे.तो पाच कोटींच्या आसपास मानधन घेतो, त्यामुळे जाहिरातींसाठी जास्त मानधन घेणाऱ्या व्यक्तींच्या यादीतही विराट अव्वल आहे. सध्याच्या घडीला विराट कोहलीची संपत्ती १४.५ मिलियन डॉलर असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे. कमाईच्याबाबतीत विराटने जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या लिओनेल मेस्सीलाही मागे टाकले आहे.फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार विराट भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत त्याने प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लायनल मेस्सीलाही मागे टाकलं आहे. बीसीसीआयच्या कराराव्यतिरिक्त तो जाहिरातींमधूनही कोट्यवधी रुपये कमावतो. कर्णधारपदाची धुरा सांभाळल्यापासून कोहलीने अनेक विक्रम नावावर केले आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या दहापैकी 8 मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. एका मालिकेत पराभव झाला, तर एक मालिका अनिर्णित राहिली. सर्वाधिक वन डे शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकत त्याने हे स्थान काबिज केलं. सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे.

Comments

comments

Loading...