काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही वाचुन थक्क व्हाल!

7237

काकूशी पुतण्याचे अवैध संबंध, वाद झाल्यावर महिलेने केले असे काही वाचुन थक्क व्हाल! येथील एका गावात अवैध संबंधांमुळे एका तरुणाची हत्या करण्यात आली. मृताच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, नात्यातील विधवा काकूशी तरुणाचे संबंध होते. दोघांत काही कारणामुळे वाद झाला. यामुळे चिडलेल्या काकूने शुक्रवारी रात्री काही जणांसोबत मिळून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.असे आहे पूर्ण प्रकरण.
ही घटना अयारी गावातील आहे. येथील रहिवासी रामकिशोर (24) याची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. कुटुंबीयांनी आरोप केला की, मृत रामकिशोरचे गावातील नात्याने काकू असणाऱ्या विधवा महिलेशी संबंध होते. काही दिवसांपूर्वी रामकिशोर आणि महिलेदरम्यान काही कारणांमुळे भांडणे झाली.महिलेने तेव्हा त्याला मारहाणही केली होती, यानंतर दोघांमध्ये संघर्ष पेटला होता. आरोप आहे की, शुक्रवारी रात्री महिला संधी साधून काही जणांना सोबत घेऊन तरुणाच्या घरात शिरली आणि धारदार हत्यारांनी वार करून त्याची हत्या केली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून महिला राजराणीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिस महिलेला कस्टडीत घेऊन चौकशी करत आहेत. पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे म्हटले.मृत तरुणाचे काका म्हणाले.
मृत तरुणाचे काका ध्रुवपाल म्हणाले की, आरोपी महिला नात्याने रामकिशोरची काकू लागते. मागच्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये अवैध संबंध होते. काही कारणामुळे वाद झाल्याने रात्री झोपण्याच्या वेळी ती घरात शिरली आणि त्याची हत्या केली. घटनेनंतर ती फरार झाली होती, परंतु पोलिसांनी तिला शिताफीने अटक केली.काय म्हणतात पोलिस अधिकारी.
-एएसपी निधी सोनकर म्हणाल्या, प्राथमिक चौकशीत कळले की, तरुणाची हत्या अवैध संबंधांमुळे झाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Comments

comments

Loading...